नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फिलिपाईन्सच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी यांनी इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट (आयआरआरआय) ला भेट दिली. येथे रिसाईलंट राईस फिल्ड लॅबोरेटरीचे मोदी यांनी उद्घाटन केले. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या दौऱ्यादरम्यान मोदी तेथील शेतात हातात फावडा घेऊन काम करताना दिसले. त्यांनी चक्क हातात फावडा घेऊन शेतात खड्डा खोदत असतानाचा मोदी यांचा फोटो समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ‘आशियान’ शिखर परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले. दूरदर्शनने ट्वीट करत एक व्हिडियो प्रसिद्ध केला आहे, ज्यात मोदी हे सदस्य देशांच्या नेत्यांसह हस्तांदोलन करताना दिसत आहेत. या आधी फिलिपाईन्सचे फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुट्रेटे यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अन्य देशाचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Prime Minister Narendra Modi visits International Rice Research Institute in Los Banos, Philippines; inaugurates Resilient Rice Field Laboratory. pic.twitter.com/zMCSAtECwp
— ANI (@ANI) November 13, 2017
COMMENTS