मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात सभेची घोषणा केली आहे. मात्र या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनसेला ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक किंवा तलावपाळी मार्गावर ही सभा आयोजित करायची आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी सरकारी यंत्रणांकडून अनेक अडथळे जाणीवपूर्वक निर्माण केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंबंधी एक पत्रक देखील पोस्ट करण्यात आले आहे. त्यात म्हंटले आहे की, जिथे एरवी इतर पक्षांच्या सभांना परवानगी मिळते तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच आडकाठी का ? आमच्या लढ्यामुळे कुणाचे हितसंबंध दुखावलेत, माफियांचे की भ्रष्ट यंत्रणेचे? आम्हाला कल्पना आहे, हे यंत्रणेचे दृष्टचक्र भेदताना हा लढा दडपण्याचा प्रयत्न होणार. भूमिका मांडण्यापासून अडवणूक करणे ही लोकशाही मूल्यांची मुस्कटदाबी नव्हे का ?, अशी संतप्त विचारणाही मनसेने या पत्रकात केली आहे.
COMMENTS