शिवसेनेच्या मंत्र्याची 16 वर्ष चाललेल्या खटल्यातून निर्दोष मुक्तता !

शिवसेनेच्या मंत्र्याची 16 वर्ष चाललेल्या खटल्यातून निर्दोष मुक्तता !

मालेगाव – शिवसेना नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची एका खटल्यातून कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे यांची लाल दिव्याची गाडी अडवून धमकी दिल्याच्या आरोपातून दादा भुसे यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. मालेगाव वर्ग 1 या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 9 फेब्रुवारी 2001 रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर 16 वर्ष हा खटला चालला.

COMMENTS