बेंगळुरू येथील एका महाविद्यालयातील बाल हक्कासंदर्भातील कार्यक्रमात कर्नाटकच्या मंत्र्याने मुलाला मार दिल्याची घटना घडली. सोमवारी येथील एका महाविद्यालयात राज्याचे ऊर्जा मंत्री डी.के शिवकुमार आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना एक विद्यार्थी शिवकुमार यांच्या मागे उभा राहून सेल्फी घेत होता. हा विद्यार्थी सेल्फी घेत असल्याचे पाहून शिवकुमार भडकले आणि त्या विद्यार्थ्याच्या हातावर मार दिला.
शिवकुमार यांनी मारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल फोन खाली पडला. या प्रकारानंतर शिवकुमार पुन्हा पत्रकारांशी बोलू लागले. या घटनेचा व्हिडिओ काही तासातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना नॉर्मल असल्याचे प्रतिक्रिया शिवकुमार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
एखाद्याला किमान अक्कल असावी. मी तेथे पत्रकारांशी बोलताना कोणी येतो आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो याला काय अर्थ आहे. असे शिवकुमार म्हणाले.
#WATCH Karnataka Min DK Shivkumar hits a man who was taking a selfie during a child rights event at a college in Belgaum (Mobile Video) pic.twitter.com/Sc2jMyK08a
— ANI (@ANI) November 20, 2017
COMMENTS