मुंबई – कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे 8 दिवसात पंचनामे करून शेतक-यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलीय.
तसेच राज्य सरकारची कृषी संजीवनी योजना ही शेतक-यांना संजीवनी देणारी नव्हे तर कृषी वसुली योजना आहे. या योजनेच्या नावाखाली सरकार 6 हजार 500 कोटी रुपयांची वसुली करीत असल्याने या योजनेचा फेरआढावा घेण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
COMMENTS