‘पूर्वी केलेल्या वाईट कृत्यांमुळेच लोकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.’ असं वादग्रस्त वक्तव्य आसामचे आरोग्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केले आहे.
गुवाहाटीमध्ये शिक्षकांना नेमणूकपत्र वाटपाचा कार्यक्रमात हेमंतविश्व शर्मा यांनी कर्करोग का होतो याचे कारण सांगून उपस्थितांना धक्काच दिला. देव आपण केलेल्या पापांची शिक्षा देतो. तरुण मुलाला कर्करोग होतो किंवा त्याचा अपघात होतो. तुम्ही जर याची पार्श्वभूमी बघितली तर त्या व्यक्तींच्या वाईट कृत्यांमुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावते. हा दैवी न्याय आहे, कधी कधी त्या व्यक्तीची चुकही नसते. त्याच्या आई-वडिलांनी काही पाप केले असतील आणि याची शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. शर्मा यांच्या विधानावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
God makes us suffer when we sin. Sometimes we come across young people suffering with cancer. If you see th background you will come to know that it is divine justice. We have to suffer divine justice: Assam Health Minister Himanta Biswa Sarma in Guwahati (21.11.17) pic.twitter.com/U2ZS5LI1vO
— ANI (@ANI) November 22, 2017
COMMENTS