भाजपच्या “विकास”चं काय होणार ? 2012 मध्ये झाला होता पराभूत !

भाजपच्या “विकास”चं काय होणार ? 2012 मध्ये झाला होता पराभूत !

गुजरातमध्ये काँग्रेसने “विकास” वेडा झाला आहे या गाण्यातून भाजपच्या विकासाच्या मुद्याची हवा काढली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने मी विकास आहे, मी गुजरात आहे असा संदेश देणारं गाणं तयार केलं होतं. यामध्ये मी विकास आहे असं म्हणणारा अभिनेत हितेश कनोडिया याला भाजपनं तिकीट दिलंय.  उत्तर गुजरातमधील ईदर या मतदारसघातून हितेश निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.   हितेश कनोडिया याने 2012 मध्येही भाजपकडून निवडणूक लढवली होती.
कादी मतदारंसघातून तो काँग्रेस उमदवाराकडून पराभूत झाला होता. ईदर मतदारसंघात भाजपचाच विद्यमान आमदार आहे. विधानसभेचे सभापती रमणलाल  हे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. आता ते दुस-या मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे हितेश इथून संधी मिळाली आहे.  आता भाजपचा विकास पास होतो की नापास हे निकालाच्या दिवशीच समजून येईल.

COMMENTS