पुणे – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लढवय्ये आहेत. भुजबळ यांच्यावरील कलम 24 रद्द केल्याने त्यांना लवकरच जामीन मिळून ते लवकरच तुरूंगातून बाहेर येतील, असे विधान सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
आज पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात कांबळे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह उपस्थित होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, महात्मा फुले वाड्याच्या परिसरातच मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे फुलेंच्या विचारांचा वारसा घेऊन राजकीय क्षेत्रात काम करत आहे. भुजबळ यांच्यावर कलम 24 रद्द केल्याने भुजबळांना जामीन मिळेल आणि ते कायद्याची लढाई जिंकून लवकरच बाहेर येतील. असे कांबळे यांनी सांगितले.
COMMENTS