मुंबई – राज्य मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ते खालील प्रमाणे…
- शेतीतील उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात वन शेती उप-अभियान राबविण्यास मान्यता.
- शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविलेल्या विविध योजनांची दखल घेण्यासह त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढविण्यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार देण्यास मान्यता.
- महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ अधिनियम-२०१७ या नवीन विधेयकाचा मसुदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास मंजुरी.
- पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषिपंपांना करण्यात आलेल्या 12 तासांच्या थ्री फेज वीजपुरवठ्यापोटी महावितरण कंपनीस अनुदान देण्यास मान्यता.
- माहिती-तंत्रज्ञान विषयक खरेदी आता GeM पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय.
COMMENTS