राजकोट – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा तशा धुमधडाक्यात होतात. मात्र रविवारच्या मोदींच्या राजकोटमधील सभेबाबत भाजपच्या नेत्यांना चांगलाच घोर लावला होता. कारण ज्या मैदानावर मोदींची सभा होती. तिथे हार्दिक पटेलची सभा 29 नोव्हेंबरला झाली होती आणि त्याच मैदानावर विजय रुपानी यांची 27 नोव्हेंबरला सभा झाली होती. रुपानींच्या सभेला हार्दिकच्या सभेच्या तुलनेत खूपच कमी गर्दी होती. त्यामुळे मोदींच्या कालच्या सभेला हार्दिकच्या सभेऐवढी गर्दी जमा करण्याचं आव्हान भाजपपुढे होतं.
मोदींची कालची सभा संध्याकाळी 6 ची होती. मात्र मोदी तब्बल अडीच तास उशीरा आले. सभेला गर्दी तर मोठी होती. मात्र मोदींचे भाषण सुरू असतानाच सभेतून जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडत होते. एकीकडे हार्दिकची सभा तीन तास उशीरा सुरू होईनही अखेरपर्यंत सभेतून गर्दी कमी झाली नव्हती. मात्र मोदींच्या सभेतून लोक निघून जात होते. मोदींच्या भाषणात आता नावीन्य राहिलं नाही अशी भावना काही लोकांनी व्यक्त केली.
COMMENTS