दिल्ली – राज्य सरकारला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं कारण म्हणज्ये दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्य सरकारतर्फे महापरिनिर्माण दिन साजरा केला गेला नाही. जगभरात विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवान केलं जात असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रशासनाला बाबासाहेब आंबेडकरांचा विसर कसा काय पडला अशा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान लॉयर्स फॉर जस्टीस या वकिलांनी एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवान केले.
दरम्यान मुंबईच्या चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले असून. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवान केलं जात आहे. देशात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेबांना अभिवान केलं जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती कोविंद, उपराष्ट्रपती व्यकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना अभिवान केलं.
COMMENTS