कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियातील संसदेत वादळी चर्चेनंतर अखेर समलैंगिक विवाहाला मंजुरी देण्यात आलीय.समलैंगिक विवाहाबाबत संसदेत गुरुवारी मतदान घेण्यात आलं. त्यावेळी फक्त पाच सदस्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला होता. समलैंगिक विवाहाच्या बाजूने सर्वाधिक मतं पडल्यामुळे संसदेला अखेर झुकतं घेऊन हे विधेयक मंजूर करावं लागलं. ऑस्ट्रेलियन मतदारांच्या 62 टक्के लोकांनी समलैंगिक विवाह पाठिंबा दर्शवला होता.
या विधेयकासाठी सरकारनं एक समिती स्थापन केली आहे.तसेच हे समान विधेयक असून ते आधीपासूनच समानता आणि धर्माच्या स्वातंत्र्यामध्ये संतूलन साधत आहे त्यामुळे या विधेयकाला मंजुरी देणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया सरकारी वकील वॉरन एन्शच यांनी संसदेत दिली.
या विधेयकाला मंजुरी मिळणार की नाही याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं परंतु अखेर ऑस्ट्रेलियाच्या संसदेनं मंजुरी दिल्यामुळे देशभरातील या विधेयकाला पाठिंबा दर्शवणा-या नागरिकांनी जल्लोष साजरा केला. आमच्या मागणी मान्य झाल्यामुळे आम्ही संसदेचं आभार मानत आहोत अशा भावना या नागरिकांनी व्यक्त केल्या.
COMMENTS