मुंबई – विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक घेण्यात आली. आज पाच वाजेपर्यंत हे मतदान झालं असून विधान परिषदेच्या 288 पैकी 284 आमदारांनी मतदान केलं. तर चार आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं नाही.
यामध्ये एमआयएमचे दोन आमदार, राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ आणि अर्जुन खोतकर या चारही आमदारांनी मतदान केलं नाही. कोर्टाकडून छगन भुजबळ यांना परवानगी न मिळाल्याने त्यांनी मतदान केलं नाही. तर एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इमितियाज जलील यांनी मतदानाला दांडी मारली. तर अर्जुन खोतकर मतदानासाठी अपात्र आहेत.
या मतदानादरम्यान विरोधी पक्षातील दोन आमदारांनी भाजपला मतदान केल्याचं समोर आलं. याबाबत पक्षाच्या विरोधात ज्यांनी मतदान केलं त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS