शेतक-यांसाठी खुशखबर ! …तर तुम्हालाही मिळणार कर्जमाफी –मुख्यमंत्री

शेतक-यांसाठी खुशखबर ! …तर तुम्हालाही मिळणार कर्जमाफी –मुख्यमंत्री

नागपूर : सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या  हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांना एक खूशखबर दिली आहे. ज्या शेतक-यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला आहे त्या पात्र शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत परंतु काही कारणास्तव त्यांनी कर्जमाफीचा अर्ज भरला नाही त्या शेतक-यांनाही कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यभरातून कर्जमाफीसाठी एकूण 77 लाख शेतक-यांचे अर्ज आले आहेत. या अर्जांची शहानिशा करून त्यापैकी 69 लाख शेतक-यांना पात्र ठरवण्यात आलं आहे. यापैकी जवळपास 41 लाख शेतक-यांच्या कर्जमाफीचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे राज्यातील अनेक शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. कर्जमाफीसाठी पात्र होते परंतु अर्ज भरता आला नाही. त्यामुळे आता आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही या चिंतेत असणा-या शेत-यांनाही आता कर्जमाफी मिळणार आहे.

COMMENTS