‘उमेदवाराने एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवावी?’

‘उमेदवाराने एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवावी?’

दिल्ली – निवडणूक लढवताना कोणीही एकाच मतदारसंघातून निवडली पाहिजे असं मत निवडणूक आयोगानं व्यक्त केलं आहे. अनेकवेळा एक उमेदवार दोन मतदार संघातून निवडणूक लढवत असतो. परंतु त्यानं असं न करता कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं मत निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयासमोर व्यक्त केलं आहे. एखादा उमेदवार दोन्ही मतदारसंघातून निवडणूक जिंकतो तेव्हा त्याला एक जागेवर सोडत राजीनामा द्यावा लागतो. यामुळे त्या जागेवर पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी लागते. निवडणूक पुन्हा घ्यावी लागल्यामुळे निवडणुकीचा अतिरिक्त खर्च होतो. त्यामुळे कोणत्याही उमेदवारानं एकाच ठिकाणाहून निवडणूक लढवणं गरजेचं असल्याचं मत आयोगानं व्यक्त केलं आहे.

तीन आठवड्यानंतर याप्रकरणी सुनावणी करणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने 13 ऑक्टोबरला निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. न्यायालयात यासंबंधी एक याचिका दाखल करत आव्हान देण्यात आलं होतं. याचिकेतून संसद तसंच विधानसभेसहित सर्व निवडणुकांमध्ये उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

 

COMMENTS