गांधीनगर – गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. या टप्प्यात एकूण ६५ टक्के मतदान पार पडलं आहे. तर यापूर्वी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यत 89 जागांसाठी मतदान झालं आहे. या दोन्ही टप्प्यातील मतदानाचा निकाल 18 तारखेळा लागणार आहे परंतु त्यापूर्वी विविध एक्झिट पोलचा गुजरातमधील कौल जाहीर झाला आहे. यामध्ये कोणाला किती जागा मिळणार हे पाहू . तर दुस 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला आहे हे 18 तारखेला समजणार आहे परंतु विविध चॅनल्सनी केलेल्या सर्वेनुसार विविध एक्झिटपोल समोर आले आहेत
एबीपी न्यूज-सीएसडीएसचा एक्झिट पोल
या एक्झिट पोलमध्ये भाजपलाच कौल देण्यात आला आहे.
उत्तर गुजरात ( एकूण जागा 53)
– उत्तर गुजरातमध्ये भाजपच आघाडीवर आहे, भाजपला तर काँग्रेसला , 18 जागा मिळण्याची शक्यता
दक्षिण गुजरात (एकूण जागा 35)
दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याठिकाणी भाजपला 24 तर काँग्रेसला 11 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहेत.
सौराष्ट्र-कच्छ (एकूण जागा 54)
– सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपाला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाला 49 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांना 10 टक्के मते मिळणाची शक्यता आहे. याठिकाणी भाजपाला 34 तर काँग्रेसला 19 आणि इतरांना एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाइम्स नाऊ –भाजप 109, काँग्रेस – 70, इतर 03
सी व्होटर – भाजप – 108, काँग्रेस – 74 इतर – 00
इंडिया टुडे-ऍक्सिस – भाजप – 99-113 काँग्रेस -68-82, इतर – 1-4
COMMENTS