नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे एकत्रित निकाल, वाचा कोणी कुठे मारली बाजी?

नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे एकत्रित निकाल, वाचा कोणी कुठे मारली बाजी?

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ६ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आणि अध्यक्षपदासाठीही बुधवारी मतदान झाले. त्या मतदानाचे निकाल गुरुवारी लागले असून कोणत्या नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकला आणि कोणाला मिळालं नगराध्यक्ष पद ते वाचा सविस्तर.

कोल्हापूर-

जिल्ह्यातील हुपरी नगरपपरिषदेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या जयश्री गाठ या विजयी झाल्या आहेत. यामध्ये भाजपला ६, ताराराणी आघाडी – ४ आणि मनसेला – २ जागा मिळाल्या आहेत.

किनवट नगरपरिषदेवर भाजपची बाजी

नांदेड – किनवट नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये नगराध्यक्षपदाची माळ भाजप उमेदवाराच्या गळ्यात पडली आहे. एकूण जागापैकी भाजपला – ९, राष्ट्रवादी काँग्रेसला ५, काँग्रेसला – २ आणि अपक्षला १ जागा मिळाली आहे.

यवतमाळ –
यवतमाळच्या पांढरकवडा नगरपरिषद निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचा करिष्मा दिसून आला आहे.  प्रहारने १९ पैकी तब्बल १४ जागांवर आघाडी घेतली आहे, तर नगराध्यक्ष पदासाठीही प्रहारच्या वैशाली नहाते यांनी आघाडी घेतली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

चिखलदरा नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला, भाजपचा दारुण पराभव  

अमरावती – जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या विजया सोमवंशी ह्या विजयी झाल्या असून विजया सोमवंशी यांनी भाजपच्या दुर्गा चौबे यांचा ३०० मतांनी पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी २ तर १७ नगरसेवकांसाठी ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

धुळे – जिल्ह्यातील सिंदखेडा नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती आले असून या निकालामध्ये भाजपला ९ , काँग्रेसला ६ तर सपाला- २ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे या ३ हजार २०० मताहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.

 

COMMENTS