ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 53 जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाचे निकाल जाहीर झाले आहेत. ठाणे जिल्हापरिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीला बहूमत मिळालं आहे. तसेच एका जागेवर तांत्रिक बिघाडामुळे फेरमतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे 52 जागांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये शिवसेनेला 26 जागा, भाजपला 14 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 तर काँग्रेसला 1 जागा आणि इतर 1 जागा मिळाली आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रावादीची युती असल्यामुळे या दोन्ही पक्षांच्या मिळून 36 जागा झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीलाच बहूमत मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेनं जरी चांगलं यश मिळवलं असलं तरी ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांना मात्र पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेची गड आला पण सिंह गेला अशीच स्थिती झाली आहे. गेल्या वेळेले राष्ट्रावदीनं इतर घटक पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती. मात्र खासदार कपील पाटील आमदार किशन कथोर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ही अवस्था दयणीय झाली होती, मात्र तरीही पक्षानं दहा जागा जिंकत ब-यापैकी यश मिळवलं आहे.
या जिल्हापरिषदेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रावदीनं युती केल्यामुळे भाजपला चांगलाच फटका बसला असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS