“बिहार विधानसभेचे 2015 मधील एक्झिट पोल आठवा”

“बिहार विधानसभेचे 2015 मधील एक्झिट पोल आठवा”

पाटणा – गुजरात विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल काल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये सर्वच एक्झिट पोलनी गुजरातमध्ये कमळ फुलेल असा अंदाज व्यक्त केलाय. मात्र बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सगळ्यांना बिहारचे 2015 मधील एक्झिट पोलची आठवण करुन दिली आहे. बिहारमध्येही सर्वच एक्झिट पोलनी भाजप विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र ते सर्वच एक्झिट पोल चुकीचे ठरले. आणि राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयू यांच्या युतीला बहुमत मिळालं होतं.

त्यामुळे हे एक्झिट पोल आठवा असं सांगत हे एक्झिट पोलही खोटे ठरतील असंच तेजस्वी यादव यांना सुचवायचं आहे. बिहारच्या जनतेनं 2015 मध्ये भाजपला तर हरवलच पण त्याचसोबत मीडियालाही हरवलं या शब्दात तेजस्वी यादव यांनी बिहारच्या एक्झिट पोलची आठवण करुन दिली. त्यामुळे आता गुजरातमधील काल दाखवलेले एक्झिट पोल खरे ठरतात की बिहारप्रमाणे तेही खोटे ठरतात हे आता येत्या 18 तारखेला समजून येणार आहे.

 

COMMENTS