पुणे – पुण्याच्या राष्ट्रवादीच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. त्या 42 वर्षांच्या होत्या.त्यांना खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आल्याचे निकटवर्तीयांकडून सांगितले आहे.तसेच मुढवा–हडपसर प्रभागातून त्या निवडून आल्या होत्या.कोद्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपद भूषवले होते. सप्टेंबर 2013मध्ये त्या महापौर झाल्या होत्या.
त्यांचे सासरे कैलास कोद्रे हे पुण्याचे माजी महापौर होते आणि शरद पवार यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते.प्रभाग क्रमांक 22 मधून त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. पहिल्याच वेळी निवडून आल्यावर लगेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदावर काम करण्याची संधी दिली होती. सतत हसतमुख व सभागृहात नेहमी बोलण्यासाठी त्या पुढाकार घेत असत. महिला नगरसेवकांचे चांगले संघटन त्यांनी केले होते. त्यांच्या अचानक निधनाने महापालिकेतील राजकीय व प्रशासनालाही धक्का बसला आहे.
COMMENTS