अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याच विजयाची चर्चा आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात खिंडार पाडलं आहे. मोदी यांचं गाव असलेल्या उंझा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. काँग्रेसच्या आशा पटेल या विजयी झाल्यात तर भाजप उमेदवार नारायणभाई पटेल हे पराभूत झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पहायला मिळालं तर तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. तसेच मोदींच्या जिल्ह्यातही भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नसल्यामुळे मोदींचं हे मोठं अपयश मानलं जात आहे. त्यामुळे भाजपचा जरी विजय झाला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचं यावरुन दिसत आहे.
COMMENTS