डहाणू – डहाणू नगरपरिषदेचे निकाल हाती आले असून या नगरपरिषदेतील जनतेनं भाजपलाच कौल दिला आहे. एकूण 25 जागांसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपला 15 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेला आठ आणि शिवसेनेला दोन जागांवर यश मिळालं आहे. तसेच नगराध्यक्षपदी भाजपचे भारत राजपूत यांचा विजय झाला आहे.
या नगरपरिषदेत मुख्य लढत भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पहायला मिळाली आहे. तसेच एकाही अपक्ष उमेदवाराला याठिकाणी यश आलं नाही. रविवारी घेण्यात आलेल्या मतदानात जनतेनं भाजपलाच कौल दिला असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपच्या पारड्यात आणखी एक नगरपरिषद पडली आहे.
COMMENTS