लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळा भोवला, न्यायालयानं ठरवलं दोषी !

लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळा भोवला, न्यायालयानं ठरवलं दोषी !

बिहार – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा भोवला असल्याचं दिसत आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी त्यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.  राची विशेष सीबीआय कोर्टाने लालू यांच्यासह १५ आरोपींना दोषी ठरवलं आहे. तर ७ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. ३ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. शनिवारी रांची सीबीआय कोर्टामध्ये लालू यादव हजर होते. निर्णय त्यांच्याच बाजुने येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे लालू  लालू प्रसाद यादव यांना काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.

1996च्या दरम्यान, बिहारमधील चारा घोटाळ्याने देश हादरून गेला होता. लालू प्रसाद यादव हे या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक आहेत. या घोटाळ्यामुळे लालू अनेकदा तुरूंगातही जाऊन आले आहेत. तसेच, त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

दरम्यान कोर्टाच्या निकालानंतर आरजेडीचे प्रवक्ता मनोज झा यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर सीबीआय काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  तसेच  मंजुरीवर ज्यांनी एफआयआर दाखल केली त्यांनाच तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. यामागे भाजपचं कारस्थान असून आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हा देश फक्त २ व्यक्ती चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

COMMENTS