मुंबई – मराठवाड्यात सतत पडत असलेल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेली अनेक वर्षांपासून मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट आहे. पाऊस कमी पडत असल्यामुळे शेतात पिकवलेलं धान्य येत नाही. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशीच काहिशी अवस्था मराठवाड्यातील शेतक-यांची झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी आपला उदरनिर्वाह भावगण्यासाठी उसतोडीसाठी जातात. मराठवाड्याच्या याच झळा कमी करण्यासाठी राज्य शासनानं आता नवी योजना जाहीर केली आहे. या विभागासाठी 100 टक्के राज्य पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना राबवण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे ३३७ कोटींचा खर्च करण्यात येणार असून मराठवाड्यातील १२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली आणण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५० कोटी आणि राज्यशासनामार्फत २० कोटी असा एकूण ७० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. २०१७-१८ या वर्षात योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी १४३.५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पूर्ण मराठवाडाभर राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे या विभागातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मराठवाडा विभागासाठी 100% राज्य पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना. मराठवाडा विभागात सतत पडणार्या दुष्काळामुळे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्याचा निर्णय #राज्यशासनाने घेतला आहे.. #forfarmers #krushisinchanyojana @CMOMaharashtra pic.twitter.com/50x0DExtjC
— Pandurang Fundkar (@Pfundkar) December 29, 2017
COMMENTS