हिमाचल प्रदेश- शिमला याठिकाणी एका काँग्रेसच्या महिला आमदारानं महिला पोलीस कर्मचा-याच्या श्रीमुखात भडकावली असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात जात असताना महिला पोलिसानं रोखल्यामुळे चिडलेल्या आमदार आशा कुमारी यांनी या महिला कर्मचा-याच्या श्रीमुखात भडकावली आहे. त्याचबरोबर महिला पोलिसानंही त्यांच्या कानशिलात मारली असल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी शिमला येथे आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला जाण्यापासून रोखल्यामुळे या महिला पोलिस कर्मचा-याला मारहाण केली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्याचबरोबर या महिला कर्मचा-यानंही आशा कुमारी यांच्या कानशिलात दिली असल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान, आशा कुमारी आणि महिला पोलीस कर्मचा-यामध्ये झालेल्या हाणामारीचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आशा कुमारी या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस आहेत.
#WATCH Shimla: Congress MLA Asha Kumari assaults woman constable, gets slapped back. She was being allegedly denied entry by Police in Rahul Gandhi's review meeting (amateur video) pic.twitter.com/puvMRnHKss
— ANI (@ANI) December 29, 2017
COMMENTS