दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तर वर्षांपासूनचा भेदभाव मोडला आहे. रविवारी त्यांनी ‘मन की बात’ या त्यांच्या कार्यक्रमामधून मुस्लिम महिलांसदर्भातील एक घोषणा केली आहे. हज यात्रेत घरातील पुरुष साथीदाराविना या महिलांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुस्लिम महिलेला हज यात्रेला जायचे असेल तर ती पुरुष सदस्याशिवाय या यात्रेला जाऊ शकत नव्हती. गेली सत्तर वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी विना मेहरम किमान चार लोकांच्या समूहात ४५ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना हज यात्रेवर जाण्यास मंजुरी दिली आहे. ज्या पुरूषाचा एखाद्या महिलेशी विवाह होऊ शकत नाही जसे की, वडील, भाऊ आणि मुलगा त्यांना मेहरम म्हटले जाते. आतापर्यंत महिला यात्रेकरूबरोबर मेहरमची आवश्यकता असायची. परंतु त्या आता एकट्याने हज यात्रेवर जाऊ शकतील. आम्ही हा नियम बदलला असून यावर्षी १३०० मुस्लिम महिलांनी पुरूष सदस्याविना हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मध्ये म्हटलं आहे.
Today, Muslim women can perform #Haj without 'mahram' and I am happy to note that this time about 1300 Muslim women have applied to perform Haj without mahram: #PMonAIR #MannKiBaat pic.twitter.com/xsrw1Q1WfC
— All India Radio News (@airnewsalerts) December 31, 2017
दरम्यान मन की बात मध्ये बोलत असताना, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही मुस्लिम महिलांमध्ये हा भेदभाव कायम होता. असा अन्याय कसा होऊ शकतो. यामुळे मी अस्वस्थ झालो असंही मोदी म्हणाले. अनेक मुस्लिम देशांमध्येही अशी परंपरा नसून आम्ही ती बंद करत आहोत. तसेच एकट्याने हज यात्रेला जाणा-या महिलांसाठी वेगळी लॉटरी पद्धत काढण्याची घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
COMMENTS