उस्मनाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला परवा तुळजापूरमधून सुरूवात झाली. त्यानंतर उस्मानाबादमध्ये सभा झाली. तर संध्याकाळी उमरग्यामध्ये सभा झाली. या सभेमध्ये अजित पवार यांचं भाषण सुरू होतं. त्याच वेळी अजानला सुरूवात झाली. त्यामुळे अजित पवार यांनी मध्येच भाषण थांबवलं. त्यावेळी बराच वेळ अजित पवार काहीही न बोलता त्याच ठिकाणी उभे होते.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 28 मार्च 2016 रोजी अजान सुरू झाल्यावर भाषण थांबवलं होतं. पश्चिम बंगालमधी वेस्ट मिदनापूर जिल्ह्यात मोदींचं भाषण सुरू असताना मध्येच अजान सुरू झालं. त्यावेळी बराचवेळ मोदीही भाषण न करता जागेवर काहीही न बोलता थांबले होते. त्याच्या आधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही कोलकत्यामध्ये भाषण करताना अजान सुरू झाल्यानंतर भाषण थांबवलं होतं.
COMMENTS