बावचळलेल्या सरकारकडं कोणतंही ठोस धोरण नाही –अजित पवार

बावचळलेल्या सरकारकडं कोणतंही ठोस धोरण नाही –अजित पवार

नांदेड – सरकार एकीकडे ग्रामीण भागात वीजेचं कनेक्शन तोडत आहे तर दुसरीकडे पाण्याचे दर वाढवले जात आहेत. त्यामुळे या बावचळलेल्या सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा शनिवारी नांदेड जिल्ह्यात पोहचली आहे. लोहा येथील सभेत बोलत असताना अजित पवार यांनी सरकारवर ही टीका केली आहे.

यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी लोहा-कंधार मतदारसंघात मागच्या तीन वर्षात अत्यंत निकृष्ट दर्जाची बंधाऱ्याची कामं झाली असल्याचा आरोप केला आहे. त्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं असून हे सरकार बावचळलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. एका बाजुला बंधा-याची निकृष्ट दर्जाची कामं आणि दुस-या बाजुला विजेचं कनेक्शन तोडून भरमसाठ पाण्याचे दर वाढवले जात आहेत. त्यामुळे हे सरकार बावचळलं आहे की काय असाच प्रश्न पडत असल्याचं त्यावेली अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS