राष्ट्रवादीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, जागा बदलण्याची सूचना !

राष्ट्रवादीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, जागा बदलण्याची सूचना !

औरंगाबाद –औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाचा समारोप 3 तारखेला होणार आहे. यादिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्तांच्या  कार्यालयाबाहेरील रस्त्यावर ही सभा होणार होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत सभेची जागा बदलण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र जागा बदलनं मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता सभेच्या जागेवरुन पोलीस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालय बाहेर ही सभा घेणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. तसेच सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून पोलिसांना पुढे करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

COMMENTS