मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सायंकाळी 7 वाजता वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान कोकणातील नाणार रिफायनरीबाबत चर्चा केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाणार रिफायनरीला असणा-या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेनेचाही पाठिंबा आहे. त्यामुळे ही रिफायनरी होऊ न देण्याची मागणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान आज होणा-या या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नाणार रिफानरीबाबत उद्या नेमकी काय चर्चा केली जाणार आहे आणि यावर मुख्यमंत्री काय निर्णय देणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
COMMENTS