पुणे – शरद पवारांच्याबद्दल आजपर्यंत आपण अनेक किस्से ऐकले असतील. मात्र राज ठाकरे यांनी पवारांची ऐतिहासिक मुलाखत घेतली. त्याआधी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांच्य कॉलेज जीवनातील काही किस्से सांगितले. त्यामध्ये पवार हे कॉलेजमध्ये कसे खोडकर होते आणि आजही त्यांचा खोडकरपण कसा आहे त्याचा एक किस्सा सांगितला.
शरद पवारांच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता. त्याचं वर्गातल्याच एका मुलीवर प्रेम होतं. तो रोज त्या मुलीला चिठ्ठी किंवा पत्र लिहायचा. मात्र त्या मुलीला तो फारसा आवडत नव्हता. त्यामुळे ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्याचं पत्र हातात पडलं की ती फाडून टाकत असे. हे पवारांना माहित होतं. एकेदिवशी पवारांनी त्या मुलीच्या नावाने त्या मुलाला पत्र लिहिलं. तु मला आवडतोस, पण मी तुझ्याशी यामुळे बोलू शकत नाही. आपण या थिएटरला सिनेमा पहायाला जाऊ. त्या मुलाने थिअटरचं तिकीटं काढलं. तो मुलगा तिची वाट पहात होता. ती आता येईल मग येईल. थोड्यावेळात पवार त्याच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसले. पवारांना त्या मुलाने विचारले ती मुलगी कधी येणार आहे. पवार म्हणाले एवढा मुलगा आला आहे तिची कशाला वाट बघतोस. तेंव्हा तो मुलागा खजील होऊन निघून गेला.
COMMENTS