जेव्हा अमित शाह राहुल गांधींची नक्कल करतात ! पाहा व्हिडीओ

जेव्हा अमित शाह राहुल गांधींची नक्कल करतात ! पाहा व्हिडीओ

कर्नाटक   भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नक्कल केली आहे. काँग्रेसवर टीका करत त्यांनी राहुल गांधीच्या आवाजात मोदीजी आपणे चार साल मे क्या किया अशी नक्कल केली आहे. तसेच आम्ही चार वर्षात काय केलं हे विचारणा-यांनी चार पिढ्या बरबाद केल्या असल्याचा आरोपही त्यावेळी शाह यांनी केला आहे. उत्तर कर्नाटकच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

कर्नाटकमधील आगामी निवडणुकांसाठी सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरु आहे. राहुल गांधींकडून भाजपवर टीकास्त्र सुरु असताना अमित शाहांनीही त्यांनी नकल करत त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेकर्नाटकमधील राजकीय वातावरण सध्या जास्तच तापत असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS