विरोधकांच्या गदारोळासह विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर

विरोधकांच्या गदारोळासह विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर

विरोधकांच्या गदारोळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अधिवेशनात राज्याचा 2017-18 चा अर्थ संकल्प सादर केला. शेतक-यांचे कर्जला अर्थसंकल्पात तरतूद असावी यासाठी विरोधी पक्षाने सभागृहात गदारोळ केला. मात्र, या गदारोळातच  मुगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. 

 

अर्थसंकल्पातील काही मुद्दे…

# मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी 25 कोटींची तरतुद.# खेकडा उपज केंद्र सिंधुदुर्गात उभारण्यासाठी 9 कोटी 31 लाखांची तरतुद. कोळंबी बीज उत्पादन योजना मोठया प्रमाणात राबवण्याचा निर्णय.

# कर्जमाफी नाहीच; विरोधकांच्या अभूतपूर्व गदारोळात राज्याचा अर्थसंकल्प सादर

# जीएसटी येईपर्यंत धने आणि ओल्या खजूरावरील कर माफ – मुनगंटीवार

# प्रक्रिया केलेल्या मक्यावरील कर माफ

# छोट्या विमानतळावरील कर कमी

# विद्यूत दाहीणी आणि गॅस दाहीणीवरील कर शून्यावर

# कार्ड स्वाईप मशीनवरील कर माफ –

# मातीपरिक्षण स्वस्थ, माती परिक्षण किटवरील कर माफ

# दुध तपासणी किट स्वस्त कर माफ

# ऑनलाईन लॉटरी, पेपर महागले, स्वाईप मशीन स्वस्त,

# साखर कारखान्यांचा उसखरेदीकर माफ करण्यात येत आहे – मुनगंटीवार

# लॉटरी आणि मद्य यांवरील कर वगळता इतर वस्तूंवर कोणतीही करवाड नाही – सुधीर मुनगंटीवार

# स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटींची तरतूद, पुढील 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प, कर्करोग निदान करण्यासाठी सोय उपलब्ध करणार, 253 आरोग्य केंद्रावर निदान आणि उपचार होईल, साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार, राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार – सुधीर मुनगंटीवार.

#मुंबईत महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सुरू करण्याचा सरकारचा विचार – सुधीर मुनगंटीवार

# औरंगाबादमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करणार – सुधीर मुनगंटीवार

# डिसेंबर 2018 पर्यंत 28 हजार ग्रामपंचायती डिजीटल होणार…

# ई-प्रशासन करण्यासाठी सरकारकडून 200 कोटी रूपयांची तरतूद – सुधीर मुनगंटीवार

# 17 कोटी 32 लाक कोटी रूपयांची मराठी भाषेसाठी तरतूद – सुधीर मुनगंटीवार

# पंढरपूर विठ्ठल वारी निर्मलवारी योनजनेअंतर्गत 300 कोटी रूपयांची तरतूद..

# महिला सक्षमिकरणासाठी 7 कोटी 94 लाख रूपयांची तरदूद – मुनगंटीवार

# राज्य स्थरावर राज्य स्मार्ट गाव निवडण्यात येणार तर, जिल्हा पातळीवर जिल्हा स्मार्ट घर ही योजाना कार्यन्वीत करणार. या योजनेसाठी विशेष तरतूद – मुनगंटीवार

# सार्वजनीक बांधकाम विभागासाठी 2हजार 348 कोटी रूपयांची तरतूद – सुधीर मुनगटीवार

#  ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी 300 कोटींची तरतूद, मराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद, मराठवाड्यातील दुष्काळासाठी कायम स्वरुपाची उपाययोजना करण्याचा प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार.

# 100 टक्के कुटूंबांना गॅस सिलींडर वाटण्याचा सरकारचा निर्धार – सुधीर मुनगंटीवार

# राज्यातील रस्त्यांची लांबी 15 हजार 404 इतकी वाढविण्य़ात आली. – सुधीर मुनगंटीवार

# नमामी चंद्रभागा ही योजना हाती घेत राज्यातील विवीध नद्यांचे जलप्रदुषण दूर करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे – सूधीर मुनगंटीवार

# नगरपालिका विकासासाठी आकराशे कोटी रूपयांचा निधी- सुधीर मुनगंटीवार

#मुंबई, पुणे मेट्रोसाठी 700 कोटी रूपयांची तरतूद – सुधीर मुनगंटीवार

# राज्यातील मेट्रो प्रकल्पासाठी 750 कोटी रूपयांची तरतूद – मुनगंटीवार

# विदर्भ,मराठवाड्यातील उद्योग विकासासाठी 1 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे – सुधीर मुनगंटीवार

# पंतप्रधा ग्रामसभा योजनेसाटी 570 कोटी रूपयांचा निधी

# शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी – सुधीर मुनगंटीवार

# मराठवाड्यातील 4000 गावात, विदर्भातील 100 गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प – सुधीर मुनगंटीवार

# नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणा – सुधीर मुनगंटीवार

# अवर्षणग्रस्त भागांत ४ वर्षांत जलप्रकल्प, विहिरी आणि मागेल त्याला शेततळे यासाठी 259 कोटींची तरतूद, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन्यासाठी 200 कोटींची तरतूद, – शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 50 कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार

# 1 लाख 22 हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणार…

# विरोधकांचा गोंधळ सुरूच, विरोधकांच्या गोंधळातच अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे रेटून साधरीकरण

# विज आणि पाण्याची बचत हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य – सुधीर मुनगंटीवार

# शिर्डी विमानतळाचा जलदगतीने विकास करण्याचा सरकारचा मानस – सुधीर मुनगंटीवार

# महात्मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी मजुरीचा दर 192 रुपयांवरुन 201 रुपये करणार – सुधीर मुनगंटीवार.

# कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक, पेठ (सांगली) कृषी महाविद्यालयं स्थापन करण्याचा निर्णय – सुधीर मुनगंटीवार.

# अॅग्रो मार्केटसाठी 50 कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार.

# शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय – सुधीर मुनगंटीवार.

# शेतकऱ्यांचे अच्छे दिन सुरू विरोधकांचे मात्र बुरे दिन सुरू – मुनगंटीवार

# राज्याचा विकास वेगाने होतेय. हा विकास जर असाच राहीला तर विरोधक केवळ एक किंवा दोनच्या संख्येनेच निवडणून येतील- मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

# शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी – मुनगंटीवार.

# चंद्रपुरमध्ये सैनिक शाळा उभारणार टप्प्याटप्याने 200 कोटी रूपये देणार – मुनगंटीवार

# मराठवाड्यातील 4000 गावात, विदर्भातील 100 गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प – सुधीर मुनगंटीवार

# महात्मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी मजुरीचा दर १९२ रुपयांवरुन २०१ रुपये करणार

# सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेकडा उपज केंद्र उभारणार

# प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता विकास योजना सुरु करणार – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

# तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता योजना

# ग्रामीण भागातील गवंडी कारागिरांना प्रशिक्षण, 10 हजार गवंडी कामगारांना रोजगाराची संधी – अर्थमंत्री मुनगंटीवार

# मराठवाड्यातील कृष्णा खोरे प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण करणार –  मुनगंटीवार

# शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळावं यासाठी 50 कोटींची तरतूद- मुनगंटीवार

# जलसंपदा खात्याला 2 हजार 800 कोटींची तरतूद  -मुनगंटीवार

# कृषीपंपासाठी 79 कोटी रूपयांची तरतूद

# टाळ वाजवत आणि बोंब ठोकेत विरोधकांची घोषणाबाजी. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

# शेततळे या योजनेत निधी कमी पडू देणार नाही – मुनगंटीवार

# महाराष्ट्राचा विकास दर 9.4 टक्के आहे, पुढच्यावर्षी दोन आकडी करण्याचा संकल्प आहे – मुनगंटीवर

# 3 लाख 56 हजार दोनशे तेरा इतके महाराष्ट्रावर कर्ज -मुनगंटीवार

# राज्यसरकार शेतकऱ्याच्या ठामपणे पाठीशी- मुनंगटीवार

# देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने मोठी झेप घेतली- मुनगंटीवार

# पूढच्या वर्षी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन अंकी करू – मुनगंटीवार

# राज्यातील उद्योग आणि शिक्षण धोरणासाठी विवीध योजना सरकारने हाती घेतल्या- मुनगंटीवार

# कोण म्हणतं देत नाही गेतल्याशीवाय राहात नाही- विरोधकांची घोषणाबाज

# कवितांची गुंफन करत अर्थमंत्री मुंनगंटीवारांनी अर्थसंकल् सादर करण्यास केली सुरूवात

# विरोधकांच्या गदारोळात अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात

# अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात.

# विधानसभेचे कामकाज सुरू

राज्याचा  2017-2018 चा वार्षिक अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये विकास दर वाढला तरी उद्योग, घरबांधणी, व्यापार, वाहतूक क्षेत्रांत घटगृह (ग्रामीण) घट झाल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला आहे. आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत राज्याच्या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

COMMENTS