मुंबईतील भाजप आमदाराची अभियंत्याला शिवीगाळ ?

मुंबईतील भाजप आमदाराची अभियंत्याला शिवीगाळ ?

मुंबई  मुंबईतील भाजप आमदारानं एका अभियंत्याला शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिकेतील अभियंत्याला पैसे उकळण्यासाठी धमकी दिल्याचा दावाही अभियंत्यांनी केला आहे. के-पश्चिम वॉर्डमधील राठोड (कनिष्ठ अभियंता) आणि पवार (सहाय्यक अभियंता) यांना ही शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमित साटम हे भाजपकडून मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आमदार असून याबाबतची बातमी एबीपी माझानं दिली आहे.

दरम्यान अमित साटम यांनी हे आरोप फेटाळले असून फोन संभाषणातील सुरुवातीचा आवाज आपला आहे परंतु शिवीगाळ करण्यात आलेला आवाज आपला नसल्याचं साटम यांनी म्हटलं आहे. पवार यांनी के-वेस्ट वॉर्ड सोडून दहा महिने झाले, म्हणजे हे संभाषण किमान एक वर्ष जुनं असावं. असं कोणतंही संभाषण झाल्याचं आपल्या आठवणीत नाही, असा दावाही साटम यांनी केला आहे.

COMMENTS