शरद पवारांचा विरोधी पक्षांना नवा मंत्र !

शरद पवारांचा विरोधी पक्षांना नवा मंत्र !

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना नवा मंत्र दिला आहे. आगामी निवडणुकीत भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेसचा विरोध सोडावा लागेल असा मंत्र पवार यांनी दिली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी बोलत असताना पवार यांनी आगामी काळाळात भाजपला रोखायचं असेल तर काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी भाजप आणि काँग्रेसला बाजूला ठेवून तिस-या आघाडीसाठी प्रयत्न केला जात आहे. तर, काहीजण काँग्रेसच्यासाथीने भाजपाला सत्तेपासून रोखण्याची तयारी करत आहेत. परंतु भाजपला जर रोखयचं असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच रोखलं जाऊ शकतं असं पवार यांनी म्हटलं आहे. देशाला काँग्रेसची गरज आहे, याला दुसरा मार्ग नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस कमजोर आहे, त्या ठिकाणीही तो राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्वात असतो त्यामुळे सर्व भारतीय स्थानिक पक्षांपर्यंतही पोहोचू शकत नसल्याचं यावेळी पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे पवार यांच्या वक्तव्यानंतर आता सर्व विरोधी पक्ष काँग्रेसलाच साथ देतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

 

COMMENTS