लखनऊ – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच अनेक पक्षातील नेते निवडणुकीच्या तयारीला लागले असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत आता पंतप्रधान मोदींना हरवण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरु केली असून सपाचे नेते अखिलेश यादव हे मोदींना आव्हान देणार असल्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून अखिलेश यादव हे निवडणूक लढवणार असल्याची चिन्ह असून समाजवादी पार्टीत सध्या त्याबाबत चर्चा रंगली आहे.
दरम्यान अखिलेश यादव हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवणार हे निश्चित मानलं जात आहे. कारण उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांसाठी अजून चार वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे अखिलेश यादव मोठा राजकीय डाव खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जर अखिलेश यादव लोकसभेच्या आखाड्यात उतरले, तर ते वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. जर अखिलेश यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवून विजय प्राप्त केला तर देशाच्या राजकारणात मोठा फेरबदल होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.
COMMENTS