मुंबई – कर्नाटक विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणूक स्वतःच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच सीमाभाग वगळता उर्वरित कर्नाटकात आतापर्यँत 50 जागांवर शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले असल्याचंही देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आणखी 25 ते 30 जागांसाठी चाचपणी सुरु असून एकूण 75 ते 80 जागा लढवण्याची शिवसेनेनं तयारी केली असल्याचं खासदार देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेतर्फे कर्नाटकमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला कोणते नेते जाणार, स्वतः पक्षप्रमुख जाणार का याबाबत लवकरच चर्चेने निर्णय घेण्यात येणार असल्याचंही देसाई यांनी म्हटलं आहे.
COMMENTS