भाजप प्रवक्ते माधव भांडारींना मंत्रिपदाचा दर्जा !

भाजप प्रवक्ते माधव भांडारींना मंत्रिपदाचा दर्जा !

मुंबई  भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांची बढती करण्यात आली असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी भांडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.

दरम्यान मागील विधानपरिषदेच्या निवडणुकीत भांडारी यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र त्यांना डावलून राष्ट्रवादीतून आयात उमेदवार प्रसाद लाड यांना तिकीट देण्यात आलं होतं.शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही आयात उमेदवार दिल्याने भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून बढती दिली जात असल्याची चर्चा असून याच पार्श्वभूमीवर भांडारी यांचीही पक्षाकडून बढती केली जात असल्याची चर्चा आहे.

COMMENTS