…तसेच जयंत पाटलांनी विधानसभेत पक्षाला विजयी करावे –अजित पवार

…तसेच जयंत पाटलांनी विधानसभेत पक्षाला विजयी करावे –अजित पवार

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पुणे येथील निसर्ग कार्यालयात पार पडली. यादरम्यान मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष पदासाठी घोषणा केली. यावेळी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी जयंत पाटलांचं अभिनंदन केलं. तसेच शहरात राष्ट्रवादीमय वातावरण तयार व्हावं म्हणून पुणे शहरात ही सभा घेतली असून 10 जून रोजी पक्षाच्या स्थापन दिवस आहे, त्या दिवशी हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभा पुण्यात होणार असल्याचंही अजितदादांनी म्हटलं आहे. कालच्या मॅचमध्ये रोहित शर्माने शेवटपर्यंत टिकून मुंबईला विजय मिळवून दिला तसेच जयंत पाटील यांनी विधानसभेत पक्षाला विजय करावे असंही अजितदादांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रदेश पदाधिकारी नियुक्त करताना तरुण आणि नवे चेहर्‍यांना संधी द्या जे 10-10 वर्ष पक्षात पदाधिकारी राहिले आहेत,  त्यांनी थोडं बाजूला होऊन पक्षाचे काम करावे. तसेच  राज्यात कायदा सुव्यवस्था, महागाई, ऊस कापूस सोयाबीन असे कुठलेही पीक घेणारा शेतकरी समाधानी नाही, शहरातील ग्राहकही समाधानी नाही. हे सगळं लोकांमध्ये खदखदत असल्याचंही अजितदादांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच  मतांची विभागणी होऊ नये आणि जातीयवादी पक्षांना फायदा होऊ नये यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी केली जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

COMMENTS