विराट कोहलीनंतर आता राहुल गांधीचे पंतप्रधान मोदींना चॅलेंज !

विराट कोहलीनंतर आता राहुल गांधीचे पंतप्रधान मोदींना चॅलेंज !

नवी दिल्ली –  क्रिकेटर विराट कोहलीनंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना चॅलेंज केलं आहे. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी फिटनेस चॅलेंज सुरू केले आहे. त्यावर विराट कोहली यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिलं आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना फिटनेस नव्हे तर फ्युल चॅलेंज दिले आहे. म्हणजेच पेट्रोल – डिझेल दरवाढ कमी करण्याचे आव्हान राहुल गांधी यांनी मोदींना केलं आहे.

दरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस देशभर निदर्शने करणार असल्याच राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. याबाबतचं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं असून त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना पेट्रोल-डिझेलची दरवाढ करण्याचं आव्हान केलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांना फिटनेस नव्हे तर फ्युल चॅलेंज दिले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे राहुल गांधी यांचं आव्हान स्वीकारुन पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS