उद्या काँग्रेस साजरा करणार विश्वासघात दिवस !

उद्या काँग्रेस साजरा करणार विश्वासघात दिवस !

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारचा 26 मे 2018 रोजी स्वतःच्या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. याचं औचित्य साधून काँग्रेसनं विश्वासघात दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिवशी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करणार आहे. तसेच मोदींनी या चार वर्षांत लोकांना खोटी आश्वासनं देऊन कशा प्रकारे फसवणूक केली हेसुद्धा उघड करण्याचा निर्धार केला आहे. शनिवारी सर्व राज्यांतील राजधानी आणि जिल्हा स्तरावर हे विरोध प्रदर्शन केलं जाणार आहे.

दरम्यान या प्रदर्शनात भाजपाला महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. मोदी सरकार 2014मध्ये सत्तेवर आले. पण राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यांना यावरून फक्त सत्तेची लालसा असून त्यांना हिंदू राष्ट्र नको असल्याची टीका सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. मोदी सरकार जम्मू-काश्मीरमधील तिढा, काश्मीर पंडितांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर तोडगा काढेल अशी हिंदुत्ववादी संघटनांना आशा होती. पण जम्मूत पीडीपीसोबत भाजपने युती केली आणि तिथेही भाजपला फक्त सत्ताच हवी असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणे आहे.

 

COMMENTS