मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साम-दाम-दंड-भेद ऑडिओ क्लिप प्रकरणी पालघर जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपच्या दोन सीडी जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिका-यांकडे तक्रार देण्यासाठी शिवसेनेलाही एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. परंतु ऑडिओ क्लिप प्रकरणात आरोप करणारी शिवसेना मात्र मुख्यमंत्रयांविरोधात तक्रार करण्यापासून अलिप्त राहिली असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान प्रशासन यंत्रणा मुख्यमंत्री-सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप यावेळी तक्रारदारांनी केली आहे. तसेच प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही विविध राजकीय पक्षाचे जिल्ह्याबाहेरचे नेते-कार्यकर्ते अजूनही मतदारसंघात असून त्यांनी प्रचार सुरु ठेवला असल्याचा आरोपही तक्रादारांनी केला आहे. तसेच मतदारांना पैसे वाटप प्रकरणात काय कारवाई झाली आणि मतदारसंघात भाजपची प्रचारची होर्डिग्स अजूनही लागलेली असल्याचा आरोपही या तक्रारदारांनी केला आहे.
COMMENTS