सचिन तेंडूलकरने ‘या’ कारणासाठी घेतली राज्यपालांची भेट !

सचिन तेंडूलकरने ‘या’ कारणासाठी घेतली राज्यपालांची भेट !

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकरने आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे. राजभवन याठिकाणी जाऊन सचिनने राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात क्रीडा तास समाविष्ट करण्याबाबत सचिनने राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले आणि एसआरटी स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृण्मय मुखर्जी उपस्थित होते.

दरम्यान सचिन तेंडूलकरने केलेल्या मागणीबाबत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली असल्याची माहिती आहे. तसेच यावेळी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले आणि एसआरटी स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृण्मय मुखर्जी यांनीही राज्यपाल यांच्याशी चर्चा करुन त्यांना महाविद्यालयीन क्रीडा तास सुरु करण्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. त्यामुळे सचिननं केलेली महाविद्यालयीन अभ्यासक्रमात क्रीडा तास समाविष्ट करण्याची मागणी लवकरच मान्य होणार असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS