मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे हे फक्त उद्घाटनाला आले परंतु यादरम्यान त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही घोषणा केली नसल्याचं वक्तव्य मनसेचे सरचिटणीस आणि माजी आमदार परशूराम उपरकर यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवेचा बट्ट्याबोळ झाला असून पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली असून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री फक्त लाईफ टाईम हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले पण जिल्ह्याच्या विकासाबाबत त्यांनी काहीही घोषित केलं नसल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला आहे.
दरम्यान जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधे नाहीत. वैद्यकीय अधिकारी नाहीत. मंत्र्यांनी जिल्ह्याच्या हिताचा काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या पदरात काहीही पडलेलं नसून कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय साहित्य पुरेसे नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. रस्ता डांबरीकरणाची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. विजेचा लपंडाव सुरूच आहे. ऊर्जामंत्र्यांनी जनतेची उपेक्षा केलेली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आले गेले होते. त्यावेळी त्यांनी फक्त उद्घाटनाचा कार्यक्रम केला आणि निघून गेले यावेळी ते जिल्ह्यातील विकासकामांबाबत बोलले नाहीत.
COMMENTS