बंगळुरू- कर्नाटकामध्ये जेडीएस आणि काँग्रेसनं सत्ता स्थापन केल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये खातेवापटावरुन वाद निर्माण झाला असल्याची चर्चा होती. परंतु या दोन्ही पक्षांमधील हा वाद आता शमणार असल्याचं दिसून येत आहे. दोन्हीही पक्षांचं खाते वाटपावर एकमत झालं असल्याची माहिती असून काँग्रेसनं कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाच वर्ष समर्थन देण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. याबाबतची औपचारीक घोषणा आज होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या औपचारीक घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान काँग्रेस आणि जेडीएस हे दोन्ही पक्ष 2019 ची लोकसभा निवडणुक एकत्र लढवणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याची माहिती आहे. ‘आमचं लक्ष फक्त खाते वाटपावर नसून युती मजबूत करण्यावर आहे. दोन्ही पक्ष मजबूत करण्यासाठी एक किमान समान कार्यक्रमाची आखणी केली जात असल्याचं काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे. कुमारस्वामी यांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यावरुन मतभेद होते परंतु ते आता दुर झाले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि जेडीएसमध्ये मुख्यमंत्रीपदांबद्दल एकमत झालं आहे. अर्थ मंत्रालय जेडीएसकडे असेल तर गृह मंत्रालय काँग्रेसला मिळणार आहे.’सगळे मुद्दे सोडवून युती सरकारला पाच वर्ष समर्थन द्यायला काँग्रेस असून लवकरच लिखित स्वरूपात याबद्दलची माहिती दिली जाणार असल्याचंही गहलोत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS