मुंबई – सितेचं अपहरण रावणाने नाही तर रामानेच केलं होतं असा अजब दावा गुजरातमध्ये बारावीच्या इंट्रोडक्शन टू संस्कृत लिटरेचरमध्ये करण्यात आला आहे. गुजरात राज्य मंडळाच्या शालेय पुस्तक विभागाने हा घोळ केला असल्यामुळे विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा हिंदू संस्कृतीचा अपमान असून भाजपमधील काही नेते स्वतःला खूप हुशार समजत आहे. त्यांच्या या हुशारीमुळेच असले शोध लावले जात असल्याची टीका काँग्रेसचे नेते अमित चावडा यांनी केली आहे. याबाबतचं ट्वीट त्यांनी केलं असून पाठ्यपुस्तकातील या चुकीमुळे शिक्षणाचा स्तर खाली घसरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Gujarat's 12th standard Sanskrit textbook says Sita was abducted by Lord Ram. – This is nothing but the mockery of our religion and also edu system. It seems BJP has dragged down the level of education merely to show some of its leader "Smarter" than they actually are! pic.twitter.com/p2DzSTFhwi
— Amit Chavda (@AmitChavdaINC) June 1, 2018
दरम्यान पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या टीमने चुकीचं भाषांतर केल्यामुळे हा घोळ झाल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. GSBST चे चेअऱमन डॉ. नितीन पेठानी यांनी ही चूक स्वीकारली असून आमच्या टीमकडून abducted शब्दाचा चुकीचा अर्थ काढला आहे. भाषांतर करणाऱ्या टीमनेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जसेच्या तसे छापलं गेलं आहे. या प्रकरणी संबंधीतांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS