काँग्रेस, राष्ट्रवादीला जोरदार धक्का, 11 नेते भाजपमध्ये दाखल !

काँग्रेस, राष्ट्रवादीला जोरदार धक्का, 11 नेते भाजपमध्ये दाखल !

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असून या दोन्ही पक्षातील 11 नेत्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सांगली महापालिकेतील 11 आजी – माजी नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असल्याचं दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी मुंबईमध्ये येऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान11 जणांच्या भाजपा प्रवेशामुळं सांगलीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला मोठी खिंडार पडली आहे. मुंबईमध्ये आज सकाळी 11 आजी – माजी नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे देखील उपस्थित होते. या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना याचा जोरदार फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS