काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचं निधन !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचं निधन !

पणजी   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचं आज निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे नाईक त्यांचं निधन झालं असून ते 73 वर्षांचे होते. गोव्यातील मार्गावमध्ये शनिवारी पहाटे 6.30 वाजता नाईक यांचं निधन झालं आहे. दरम्यान ह्रदय विकाराचा धक्का येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं.  त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता कंकोलिम येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान 1967 मध्ये शांताराम नाईक यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. 1984 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार राहिले होते. तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेतून खासदारकी भूषवली आहे. तसेच ते गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. त्यांच्या या जाण्यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

COMMENTS