अखिलेश यादव यांच्या ‘या’ निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपला जड जाणार ?

अखिलेश यादव यांच्या ‘या’ निर्णयामुळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपला जड जाणार ?

नवी दिल्ली आगामी लोकसभा निवडणुकी भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असल्याचं दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही भापला हरवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मायावती यांच्या  बसपाशी आघाडी करण्याचा निर्णय अखिलेश यांनॉनी घेतला असून आघाडीत बसपला जास्त जागा देणार असल्याची तयारी अखिलेश यांनी दर्शवली आहे.

दरम्यान एका जाहीर सभेत अखिलेश यादव यांनी बसपासाठी कोणताही त्याग करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात बसपा-सपा आघाडी होण्याची चिन्हं दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी अखिलेश यांनी दोन-चार जागा कमी मिळाल्या तरी चालती असं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बसपा-सपा आघाडी होणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान  मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागांपैकी भाजप आघाडीला ७३ जागा मिळाल्या होत्या. त्यात सपाला ५ आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवरच विजय मिळविता आला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत बसपला खातेही खोलता आले नव्हते, मात्र बसपाच्या मतांची टक्केवारी वाढली होती.  शिवाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने जास्त जागा पटकावल्या होत्या. त्यामुळेच अखिलेश यांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात असून त्यांचा हाच निर्णय आगामी निवडणुकीत भाजपला जड जाणार असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS