उत्तर भारतातील प्रसिद्ध गायक आणि डान्सर सपना चौधरीच्या राजकीय ठुमक्यांची सध्या मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सपना चौधरी हिनं गेल्या आठवड्यात काही काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही भेटण्यासाठी ती दिल्लीत गेली होती. मात्र काही कारणांमुळे ती भेट होई शकली नाही. सपना चौधरीच्या या राजकीय भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आलंय.
सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशाही चर्चा सुरू आहे. सपना चौधरीच्या या काँग्रेस प्रवेशाने भाजप खासदारांचा राग मात्र अनावर झालाय. भाजपचे खासदार अश्विनी चोप्रा यांनी या प्रकरणावर वादग्रस्त विधान केलं. सपना चौधरी ही ठुमके लगानेवाली आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच काँग्रेसला ठुमके लगाने है या चुनाव जितना है असंही वक्तव्य केलं. यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वादावादी सुरू झालीय.
सपना चौधरीनं भाजप खासदार अश्विनी चोप्रा यांना उत्तर दिलंय. कोणी काहीही बोललं तरी मला फरक पडत नाही. मात्र एवढ्या मोठ्या लोकांचं प्रतिनिधीत्व करणा-यांनी सभ्यतेनं बोलायला हवं असा टोला तिनं चोप्रा यांना लगवाला आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. जो जसा विचार करतो तसा तो व्यक्त होत असतो असंही सपना चौधीरनं म्हटलं आहे. एक खासदार असतना चोप्रा यांनी अशा प्रकारचं विधान केल्यानं त्यांच्यावर सोशल माध्यमातून टिका होत आहे.
राजकारणाच्या प्रवेशाच्या चर्चांवरही सपना चौधरीनं आपली बाजू मांडली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते. कोणत्याही राजकीय पक्षात मला सहभागी व्हायचे नाही. मी माझ्या व्यवसायामध्ये समाधानी आहे. त्यामुळे मी तिथेच राहणार आहे. सोनिया गांधी या मला चांगल्या वाटतात. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेले होते. काँग्रेसमध्ये प्रवेश न करता पक्षाचा हरियाणा आणि देशभर प्रचार करण्याची इच्छा असल्याचंही सपना चौधरीनं स्पष्ट केलंय.
सपना चौधरी हिचा हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार यासह उत्तरेकडील राज्यात मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिला मोठा फॅनफॉलोअर आहे. तसंच ती अश्लील डान्स करते असा आरोप करणाराही एक वर्ग आहे. काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा उपयोग करुन घेणार अशी चर्चा आहे. सपना चौधरीला स्टार प्रचारक बनवण्याचाही काँग्रेसचा विचार असल्याचं बोललं जातंय. त्याचाच धसका भाजपनं घेतला असं दिसंतय. भाजपमध्येही बॉलिवूडच्या कलाकारांची कमी नाही. मग सपना चौधरीवरुन काँग्रेसवर हल्लाबोल का ? असा प्रश्न विचारला जातोय. सपना चौधरी काँग्रेसची स्टार प्रचारक बनते का ? बनलीच तर तिचा काँग्रेसला किती फायदा होतो ? हे तर निवडणुक झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र सपनाच्या राजकीय ठुमक्यावरुन भाजप नेत्यांचा तिळपापड होतोय हे नक्की.
COMMENTS